मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : मोहोळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभाशिर्वाद दिले.
यावेळी शिरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील व महादेव ताकमोगे यांनी तहसीलदार मुळीक साहेबांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महसूल प्रशासनात त्यांनी पारदर्शकता, तत्परता आणि जनतेप्रती संवेदनशीलता जपली असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.
मोहोळ तालुक्यातील विविध प्रशासकीय कामकाजात शिस्तबद्ध नियोजन, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि आपुलकीची वागणूक यामुळे मुळीक साहेबांनी नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


0 Comments