Advertisement

Breaking News
Loading...

पंढरपूर तालुक्यातील सराईत वाळू तस्करावर MPDA अंतर्गत कारवाई... सुरज शिंदे येरवडा कारागृहात स्थानबद्ध; सोलापूर ग्रामीण पोलिसांची ठोस भूमिका...

                                      सुरज शिंदे 

पंढरपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दि. 27 फेब्रुवारी 2026 – पंढरपूर तालुक्यातील सराईत वाळू तस्कर सुरज हरीभाऊ शिंदे (रा. अनवली, ता. पंढरपूर) यास Maharashtra Prevention of Dangerous Activities Act (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्ध करून येरवडा सेंट्रल जेल येथे रवाना करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी यांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरज शिंदे याच्याविरुद्ध वाळू चोरी, अवैध वाळू उपसा, चोरीची वाळू वाहतूक करून विक्रीस पाठविणे आदी गंभीर गुन्हे दाखल होते.

त्याच्या वारंवारच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले.

यापूर्वी सुरज शिंदे यास हद्दपार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवून परिसरात दहशत निर्माण केली होती. अखेर पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी त्यास ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर, सपोनि रेळेकर, पोसई भोसले, वडणे, सपोफौ गायकवाड, पोकॉ सागर गवळी, पोहेकॉ अनिस शेख, पोहेकॉ मोहन मनसावाले तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील उत्कर्ष देवकुळे व विलास म्हेत्रे आणि इतर अधिकारी-अंमलदार यांच्या सहभागाने पार पडली.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, वाळू तस्करी तसेच शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.



Post a Comment

0 Comments