छत्रपती संभाजी नगर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘ठाकूर’ अनुसूचित जमातीच्या दाव्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत अबासाहेब गुलाबराव ठाकूर व त्यांच्या दोन मुलांच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल दिला. मा. न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे आणि मा. न्या. संदिपकुमार सी. मोरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
नंदुरबार व धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिलेले जात दाव्याचे अमान्य आदेश रद्द करून न्यायालयाने ते रद्दबातल ठरवले. यापूर्वी समितीने ‘अॅफिनिटी टेस्ट’ व एका नोंदीतील ‘ब्रह्मभट’ उल्लेखाच्या आधारावर दावा फेटाळला होता.
मात्र, न्यायालयाने नमूद केले की १९१९, १९२५ आणि १९३४ या पूर्व-स्वातंत्र्यकालीन शालेय नोंदींमध्ये ‘ठाकूर’ असा स्पष्ट उल्लेख असल्याने त्यांना अधिक पुराव्याचे मूल्य आहे. केवळ एका विरोधी नोंदीच्या आधारे दावा नाकारता येत नाही. तसेच ‘अॅफिनिटी टेस्ट’ ही एकमेव निकष ठरू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यामुळे तिन्ही रिट याचिका मंजूर करून संबंधित समित्यांना ‘ठाकूर’ अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले.
‘ठाकूर’ अनुसूचित जमातीच्या दाव्याला न्याय मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक यशाबद्दल याचिकाकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
तसेच या प्रकरणात प्रभावी बाजू मांडून न्यायालयीन लढाई यशस्वी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुशांत येरमवार साहेब (मो. 98230 99140) यांचेही हार्दिक अभिनंदन व कौतुक...!
ॲड. सुशांत येरमवार यांच्या अभ्यासू युक्तिवादामुळे व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सत्याला न्याय मिळाला. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!


0 Comments