सोलापूर| हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :— सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आज सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील संवाद हॉल येथे आढावा बैठक घेतली. बैठकीत मागील वर्षातील गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाला शासनाकडून प्राप्त झालेल्या एकूण चार नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे सेवार्पण सुनील फुलारी व एम रामकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनमुळे घटनास्थळीच वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करून ते मूळ स्थितीत तपासणीसाठी पाठविणे शक्य होणार आहे.
तसेच सोलापूर आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन किटचेही पोलीस विभागास वितरण करण्यात आले. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्पर आणि प्रभावी प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.
कार्यक्रमात अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतमकुमार यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन फॉरेन्सिक सुविधांमुळे गुन्हे तपास अधिक शास्त्रीय व प्रभावी होऊन पुढील काळात दोषसिद्धी दरात वाढ होईल आणि नागरिकांना जलद न्याय मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.





0 Comments