Advertisement

Breaking News
Loading...

“शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी उशिरा; रुग्णांची गैरसोय, कारवाईची मागणी”...

 

मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:

शिरापूर (सो) प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.



पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य केंद्रात कर्मचारी वेळेवर न आल्याने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. याबाबत संबंधित अधिकारी पात्रुडकर व नवले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर मोहोळचे गट विकास अधिकारी जमदाडे यांनी फोन उचलून संवाद साधल्याचे पाटील यांनी सांगितले. या संदर्भातील संवादाची ध्वनिफीतही उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून ग्रामीण भागातील नागरिक पूर्णपणे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. त्यामुळे वेळेवर सेवा न मिळाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments