Advertisement

Breaking News
Loading...

*डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरात भव्य स्वच्छता अभियान...* *श्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग; RTO परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता...*


 सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त, सद्गुरु आज्ञेनुसार रविवारी (दि. १ मार्च २०२६) सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत आज सकाळी ७.०० ते १०.३० या वेळेत सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर (RTO) परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली. या उपक्रमात सुमारे १५० ते २०० श्री सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते.

सदस्यांनी परिसरातील कचरा गोळा करणे, झाडाझडती करणे, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी कामे मोठ्या प्रमाणात केली. या उपक्रमामुळे RTO कार्यालय परिसर स्वच्छ, सुटसुटीत आणि देखणा झाला.

सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन करत समाजहिताच्या कार्यात सहभागी होणे, हीच खरी सेवा भावना असल्याचे मत उपस्थित श्री सदस्यांनी व्यक्त केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे समाजात स्वच्छतेचा आणि सेवाभावाचा संदेश पोहोचत असल्याची भावना व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments