Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये विज्ञानाची मेजवानी; लिटिल स्टार पब्लिक स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : लिटिल स्टार पब्लिक स्कूल येथे शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री अमोगसिद्ध सेवा मंडळ संचलित या शाळेत विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडवले.



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हवालदार चेतन गवंडी व भीमसेन देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब काळे सर होते. यावेळी सहसचिव श्री. प्रमोद व्हनकोरे, मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम तसेच श्री सद्गुरु धुळेश्वर विद्यालय यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ‘सोलर सिस्टिम’, ‘ट्रॅफिक रुल्स’, ‘टाइप्स ऑफ हाऊस’, ‘सेन्स ऑर्गन्स’, ‘हेल्दी फूड’ आणि ‘अनहेल्दी फूड’ यांसारख्या विविध विषयांवर आकर्षक मॉडेल्स आणि प्रयोग सादर केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रकल्पामागील वैज्ञानिक संकल्पना आत्मविश्वासाने समजावून सांगितली.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देत जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली असून पालक व उपस्थितांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.


Post a Comment

0 Comments