मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित दिमाखदार सोहळ्यात मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व क. महाविद्यालय या शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व करमाळा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या वार्षिक विज्ञान अधिवेशन समारंभात विज्ञान विषयातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील ‘आदर्श शाळा’ म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत तसेच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या मा. रश्मीताई बागल यांच्या शुभहस्ते प्राचार्य तथा मुख्याध्यापक मा. श्री बसप्पा घाटे सर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष मा. श्री संजय जवंजाळ, सचिव डॉ. श्री नूर अहमद कारंजे, सोलापूर विद्यापीठ चे मा. डॉ. श्री विकास पाटील, करमाळा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय भस्मे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण प्रसंगी उपप्राचार्य श्री बसप्पा कुमठेकर, पर्यवेक्षक श्री मदगोंडा मलकारी तसेच शिक्षक व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. शिवशरण अण्णा पाटील, सचिव तथा माजी सभापती मा. श्री गुरुसिद्ध मामा म्हेत्रे, सहसचिव तथा माजी युवा सरपंच मा. श्री आप्पासाहेब म्हेत्रे, उपाध्यक्ष श्री महादेव शिळ्ळे व संचालक मंडळ, शालेय व्यवस्थापन समिती, श्री मल्लिकार्जुन वस्तीगृह तसेच गावकरी व पालक वर्गाने अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विज्ञानाचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या कार्याची ही दखल असून, मंद्रूपच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.









0 Comments