वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातील कुरेशी गल्ली येथे गोवंशसदृश प्राण्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी छापा टाकून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे सुमारे ५०० किलो मांस जप्त केले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ मार्च रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता वळसंग पोलीस ठाण्यातील पथक कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वळसंग येथील अमीन गुलाब कुरेशी यांच्या दुकानात गोवंशसदृश प्राण्याचे मांस विक्रीस ठेवले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
सकाळी सुमारे ८.१५ वाजता दुकानाची तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात गोवंशसदृश प्राण्याचे मांस आढळून आले. पोलिसांनी अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे सुमारे ५०० किलो मांस पंचासमक्ष जप्त केले.
या प्रकरणी अमीन गुलाब कुरेशी (वय ४९), गौस अमीन कुरेशी (वय २३), अकबर जिलानी कुरेशी (वय ४९), सलिम हुसेन बागवान (वय ४०) आणि खलील सैपन कुरेशी (वय ३२, सर्व रा. वळसंग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस नाईक राहुल बनकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, पोलीस ठाणे अंमलदार बंदिछोडे यांच्या समक्ष जबाब नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५-क, ५-ब, ९ व ९-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी चव्हाण करीत आहेत.
.jpeg)

0 Comments