Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : ४.२८ कोटींच्या अंमली पदार्थांचा जाळून नाश...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दि. २० मे २०२६ :

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ४ कोटी २८ लाख २७ हजार ६३५ रुपयांच्या गांजा व अफूचा नाश केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसणार आहे.

भारत सरकार व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमार्फत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या २९ गुन्ह्यांमधील मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कारवाईत १६९७ किलो ४२९ ग्रॅम गांजा (किंमत ₹४,२४,३५,२७५) व १९ किलो ६१८ ग्रॅम अफू (किंमत ₹३,९२,३६०) असा एकूण ₹४,२८,२७,६३५ किमतीचा मुद्देमाल समाविष्ट होता.

दि. १५ मे २०२५ रोजी समितीची बैठक पार पडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोतील इन्सिनरेटरमध्ये समितीच्या उपस्थितीत मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला.

कारवाईत सहभागी अधिकारी:

अतुल कुलकर्णी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

शिरीष हुंबे – पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय)

पोनि संजय जगताप – स्था. गु.शा.

सुधीर खांडेकर – वजन मापन निरीक्षक

अभिजीत लोहीया – क्षेत्र अधिकारी, प्रदूषण मंडळ

डॉ. गु. रा. देशमुख – सहायक रासायनिक विश्लेषक, सी.ए. पुणे

राहूल पाटील – वैज्ञानिक सहाय्यक, सी.ए. पुणे

शासकीय पंच :

रोहन उद्धव लोंढे, विकास थोरात (उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग)

पोलिस पथकाचे योगदान:

प्रभाकर ताटे-देशमुख (पो.उपनि.), निलकंठ जाधवर (स.फौजदार), कमल बुरकुल, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, अनिस शेख, गणेश बांगर, अश्विनी गोटे, दिपाली जाधव, अशोक हलसगी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे मुद्देमाल कारकून यांनी ही कारवाई पार पाडली.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments