Advertisement

Breaking News
Loading...

आंतरजिल्हा घरफोडी टोळी जेरबंद; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त... सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..!

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ४ ते ५ मे २०२६ दरम्यान न्यू बुधवार पेठ परिसरातील दोन बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या प्रकरणात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

दि. १२ मे रोजी पुणे येथे सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये:

दिपक बाळू ढेरंगे

दत्ता अरुण कदम

आकाश सुर्यकांत आंग्रे

साहेबराव लक्ष्मण बेंडूरे

यांचा समावेश आहे.

तपासात आरोपींनी मारुती सुझुकी ईको कारने पुण्यावरून सोलापूरात येऊन एकाच रात्री दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडून १५ हजार रुपये रोख, ३० हजार रुपयांचा सोन्याचा दागिना आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, मुख्य आरोपींवर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर MCOCA अंतर्गत कारवाईही झालेली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर व स.पो.नि. जे. व्ही. गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासह पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, दिपक जाधव, मंजूनाथ मुत्तनवार, राजेश मोरे, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पथकातील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी ही कारवाई यशस्वी केली.

 गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments