येळेगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी वादळवार आणि मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, येळेगाव येथील शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र उडालेल्या पत्र्यांमुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर येळेगावचे प्रशासकीय सरपंच राजू लोणारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळेवर तात्काळ मजबूत स्लॅब टाकण्यात यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन देण्यात येणार आहे.”
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच पालक उपस्थित होते. त्यांनीही शाळेची इमारत सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना आवश्यक सध्या शाळेची स्थिती धोकादायक बनली असून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलणे गरजेचे आहे. शाळेवर कायमस्वरूपी स्लॅब बसवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित होत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments