Advertisement

Breaking News
Loading...

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला..! पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू; 6 जणांवर उपचार सुरू...


माळशिरस | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाविक देवदर्शन आटोपून आपल्या गावाकडे परतत होते. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहन काही क्षणांतच पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून 6 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

(टीप : ही प्राथमिक माहिती असून मृत व जखमींचा आकडा अधिकृत माहितीनुसार बदलू शकतो.)



Post a Comment

0 Comments