Advertisement

Breaking News
Loading...

लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; विद्यार्थी व नागरिकांना सहभागाचे आवाहन...

 



सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराजांच्या विचारांची जाणीव निर्माण करणे तसेच सामाजिक समता, शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आशुतोष तोंडसे यांनी दिली.

राज्यभरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा तीन गटांत विभागण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १२ वी आणि खुला गट यांचा समावेश आहे. स्पर्धकांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक न्याय, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर निबंध लेखन करावयाचे आहे.

स्पर्धकांनी आपला निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून टपालाद्वारे पाठवावा किंवा त्याची PDF प्रत ई-मेल अथवा व्हॉट्सअपद्वारे सादर करावी. निबंध पाठविण्याची अंतिम तारीख २२ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

निबंध पाठविण्याचा पत्ता ‘लोकराजा अभ्यासिका, पहिला मजला, वैदांत टॉवर, भारती विद्यापीठ समोर, विजापूर रोड, सोलापूर – ४’ असा आहे. तसे samyakacademy95@gmail.com या ई-मेलवर किंवा 9960372736 व 7038883339 या व्हॉट्सअप क्रमांकांवर निबंध पाठविता येणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, राज्यभरातील विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी बुद्धजय सुशीलदेवी अण्णासाहेब भालशंकर (मो. 9960372736) तसेच आशुतोष सुरेखा विनायक तोंडसे (मो. 7038883339) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments