मनगोळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे अवैध पिकअप सोडवल्याच्या संशयावरून एका तरुणावर सळई, चाकू व दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
कमलाकर औदुंबर डिरे (वय २८, रा. मनगोळी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड वस्तीजवळ गणेश मोरे व नंदकुमार मोरे यांनी "दोन नंबरची पिकअप का सोडवली?" अशी विचारणा करत कमलाकर डिरे यांना सळई, चाकू व दगडाने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


0 Comments