मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | तालुका प्रतिनिधी आरिफ नदाफ : कारुहुनवी सणानिमित्त मंद्रूप येथील शेतकरी तथा जनावरांचे प्रसिद्ध व्यापारी दानेश शेख यांच्या बैलांची पारंपरिक मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीचे अध्यक्षस्थान राजेश देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांनी भूषविले.
मंद्रूप बाजारपेठेतून वाजत-गाजत निघालेल्या या मिरवणुकीने गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मंद्रूप तलाव परिसर गाठला. त्यानंतर देशमुख वाड्यात मानकरी हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने करतोड करण्यात आली आणि मिरवणुकीची सांगता झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून गुडूभाई शेख यांच्या पुढाकाराने व राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कारुहुनवी निमित्त बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा मंद्रूपमध्ये जोपासली जात आहे. त्याच परंपरेचा वारसा जपत यावर्षी दानेश शेख यांनी हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही मिरवणूक उत्साहात आयोजित केली.
यावेळी मळसिद्ध मुगळे, बुडन शेख, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, सुरेश टेळे, रमजान शेख, सुनील व्हनमाने, मळसिद्ध सलगरे, शरणू ख्याडे, शिरसू शिंगडगाव, बबलू शेख, शिकूर शेख, शिव लोभे, आसिफ शेख, सद्दाम शेख, शब्बीर शेख, रजाक शेख, मोहसीन शेख, मिरासाब लिगवान, शफीक बागवान, तात्या कोरे, लक्ष्मण बनसोडे, सागर देशमुख, अप्पू माने, जाविद तांबोळी, शरीफ लिगवान, सुभान शेख, महिबूब शेख, रियाज दुमदुमे, चौडप्पा कोरे, शफीक दिंडोरे, सादिक अत्तार, बाळू शेंडगे, इम्रान कोरके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments