मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शिरापूर–लोकमंगल रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांचा संताप आता तीव्र झाला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मोहोळ कार्यालयासमोर भीक मागून अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. ६ जुलै रोजी अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊनही भीक मागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एवढ्यावरही दखल घेतली नाही, तर शिरापूर ते लोकमंगल रस्त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भीक मागून जनजागृती आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वर्षानुवर्षे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने तातडीने निर्णय घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.


0 Comments