मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी अरिफ नदाफ | समाजात जन्म झाला, सेवानिवृत्त झाल्यावर त्याच समाजाकडून सत्कार होणे हे भाग्याचे असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे यांनी केले. आजच्या काळात प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावून समाजात गौरव मिळविणे जिकिरीचे असले, तरी समाजातील वडीलधारी व ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट सेवा बजावता आल्याचे त्यांनी सांगितले.
मंद्रूप येथील वीरशैव लिंगायत पंचम वाणी समाज संघटनेच्या अध्यक्ष रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले यांच्या पुढाकारातून व नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या मान्यवरांचा गौरव सोहळा सकळेश्वर मंदिर येथे उत्साहात पार पडला. यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करत समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शिवशंकर मेंडगुदले होते. बाबूराव मेंडगुदले, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले, नागनाथ घाटे, धुंडप्पा मेंडगुदले, रवीकुमार शिळ्ळे, ओगसिद्ध मेंडगुदले, राजकुमार उंबरजे, भगवान मेंडगुदले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त लिपिक राजकुमार वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे, जिल्हा उद्योग केंद्रातील लिपिक मल्लिनाथ धनाळे, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारप्राप्त अशोक लिगाडे, लोकसेवाचे नूतन प्राचार्य बसप्पा घाटे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले गौरीशंकर मेंडगुदले, वांगी येथील पोलीस उपनिरीक्षक मनीष बिराजदार, ठाणे येथे पोलीस म्हणून नियुक्ती झालेल्या लक्ष्मी होनराव तसेच कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या शुभम कारंजे यांचा समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांनी शासकीय सेवा बजावताना सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत निष्कलंक सेवा करण्याचे आवाहन केले. तसेच उर्वरित आयुष्यात समाजातील तरुणांना मार्गदर्शन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सुरेश मेंडगुदले, सुभाष मेंडगुदले, मल्लिकार्जुन वाडकर, विश्वनाथ सिंदखेडे, गिरीष मेंडगुदले, बसवराज सिंदखेडे, महेश मेंडगुदले, दयानंद घाटे, चिदानंद मोकाशी, जगन्नाथ धनाळे, अमित वाडकर, श्रीशैल मुंजे, कुमार मेंडगुदले, सिद्धाराम घाटे, संजय मेंडगुदले, चिदानंद मेंडगुदले, इरेश उंबरजे, नागेश मेंडगुदले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संघटनेचे अध्यक्ष रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले यांनी केले. विकास शिळ्ळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अमोगसिद्ध मुंजे यांनी केले, तर रवींद्र वाडकर यांनी आभार मानले.


0 Comments