कंदलगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | ता. २० जुलै : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सोमवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घराशेजारी खेळत असताना विजेच्या खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज गोरख साठे (वय ६, रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) हा सोमवारी (दि. २० जुलै) सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घराशेजारी खेळत होता. यावेळी विजेच्या खांबाला असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा विद्युत धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कृष्णांत रामचंद्र साठे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मात मृत्यू क्रमांक ४८/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जीपीएसआय राठोड करीत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे कंदलगाव परिसरात शोककळा पसरली असून, चिमुकल्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments