Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ |

मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख, माजी सभापती अप्पाराव कोरे, मौलाना आझाद संघटना मंद्रूपचे अध्यक्ष सिकंदर आवटे, सिद्धाराम काळे, अलताफ शेख तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख म्हणाले, "जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत भारतातील येणाऱ्या पिढ्यानपिढ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी देशासाठी दिलेले अमूल्य योगदान कधीही विसरणार नाहीत. त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा प्रत्येक भारतीयासाठी कायम मार्गदर्शक राहील."

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा आदर्श घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments