मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्व. दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कामती (ता. मोहोळ) येथे कार्यरत तसेच मूळचे निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील श्री. बाळासाहेब मल्लेशी कोळी यांचा कामती खुर्द येथील ग्रामस्थ, युवक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार मुळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार अर्पण करून कोळी यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार क्षिरसागर यांनी शुभेच्छा देत कोळी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक केले.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, संघटनात्मक कामात धडाडीने नेतृत्व करणारे तसेच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेणारे बाळासाहेब कोळी यांना पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभास सेवानिवृत्त शिक्षक तथा गणित महामंडळाच्या मुंबई रिसोर्स सेंटरचे तज्ज्ञ मार्गदर्शक नंदकुमार मुळे सर, उद्योजक महादेव माळी, सुमीत माने, शहाजान शेख, औदुंबर गावडे, दत्तात्रय पाटील, गोविंद काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक क्षिरसागर, शिवाजी पाटील, आकाश गावडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर कांबळे यांच्यासह कामती खुर्द येथील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 Comments