जुळे सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान, जुळे सोलापूर यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच गुणीजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देतानाच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
कोळी समाजातील इयत्ता १० वीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तसेच इयत्ता १२ वीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे सन्मान सोहळ्यासाठी कळविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, मिळालेले गुण/टक्केवारी, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव तसेच पालक/विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक अशी माहिती द्यावी. तसेच सर्व संबंधितांनी आपली मार्कलिस्ट जमा करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नावे व कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत : ५ सप्टेंबर २०२६
अधिक माहितीसाठी संपर्क :
86683 32235 | 9011026068 | 9403485578
“एकता हीच आमची शक्ती, शिक्षण हीच प्रगतीची भक्ती” या विचारातून आयोजित या उपक्रमाला समाजातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान, जुळे सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments