मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर–विजापूर रोडवरील वडगाव (शिवार) परिसरातील आम्रपाली ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. विनापरवाना तसेच नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईत १० पुरुष व ४ महिलांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ऑर्केस्ट्रा बारमधून ₹४ लाख ८२ हजार रुपयांची रोकड, ऑर्केस्ट्रा बारमधील साहित्य, मोटारसायकल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम सासवे, पोलीस नाईक सिंकदर मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल अशपाक मियावाले, पोलीस कॉन्स्टेबल बिरण्णा वाघमोडे, महिला पोलीस अंमलदार पूजा काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या कांबळे, चापोलीस कॉन्स्टेबल नानासाहेब अवघडे आदींनी केली.
विशेष : या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या आस्थापनांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.


0 Comments