Advertisement

Breaking News
Loading...

मनमानीला पूर्णविराम! रिपब्लिकन सेनेची सोलापूरमध्ये संघटनात्मक पुनर्बांधणी; १४ नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | रिपब्लिकन सेनेची सोलापूर लोकसभा व जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य सय्यद युसुफ यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनात्मक पुनर्बांधणी, पक्षशिस्त, संघटन विस्तार आणि आगामी कार्यक्रमांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.






बैठकीत पंढरपूर तालुका व माढा लोकसभा येथील यापूर्वीच्या सर्व निवडी रद्द करून नव्याने पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. यासोबतच सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.






नवनियुक्त प्रमुख पदाधिकारी:

  • माढा लोकसभा महिला अध्यक्ष — आशाताई रिकिबे
  • पंढरपूर तालुका अध्यक्ष — सचिन जाधव
  • सोलापूर शहर युवक अध्यक्ष — सुबोध सोनकांबळे
  • सोलापूर शहर महिला अध्यक्ष — राधाबाई गायकवाड
  • सोलापूर शहर महासचिव — इमरान भाई बागवान
  • सोलापूर लोकसभा जिल्हा सचिव — विश्वास गायकवाड
  • मोहोळ तालुकाध्यक्ष — पांडुरंग दावणे
  • माढा लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष — कुंडलिक साठे
  • दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष — संतोष फडतरे
  • दक्षिण सोलापूर युवा अध्यक्ष — वैभव गायकवाड
  • दक्षिण सोलापूर युवा महासचिव — शंकर भडकुंबे
  • करमाळा तालुकाध्यक्ष — प्रवीण ओहाळ
  • उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष — प्रवीण मसलखांब
  • अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष — गणेश भालेराव





नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी यांनी अभिनंदन करून संघटन विस्तारासाठी शुभेच्छा दिल्या. “पद हा सन्मान नसून जबाबदारी आहे,” या भावनेतून पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विचारधारेसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे, असे आवाहन करण्यात आले.







गटबाजी आणि मनमानीविरोधात प्रदेशाध्यक्षांचा इशारा

बैठकीत पक्षांतर्गत कुरघोड्या, गटबाजी, मनमानी कारभार आणि पक्षाच्या ध्येय-धोरणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला.





“आता पक्षामध्ये कोणाचाही मनमानी कारभार चालणार नाही. पक्षशिस्त मोडून स्वतःच्या मर्जीने कारभार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पक्षाच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा डॉ. सूर्यवंशी यांनी दिला.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, शहराध्यक्ष शरणू अण्णा हजारे, जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे, शहर उपाध्यक्ष किरण जौंजट, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महेबुब शेख, शहर सचिव विकी बनसोडे, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष मतीन भाई सातखेड, गणेश उपासे आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. संदीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

बैठकीला रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात सोलापूर लोकसभा व जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.


Post a Comment

0 Comments