मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ |ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. याच अनुषंगाने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
मंद्रूप ग्रामपंचायतीच्या विविध प्रशासकीय व विकासकामांना गती मिळण्यासाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची आवश्यकता असल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासह नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावीत, तसेच शासनाच्या विविध योजना व विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूरचे गट विकास अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत मंद्रुप ग्रामपंचायतचा विषय मार्गी लावण्यास सांगितले
यावेळी काँग्रेसचे महमद शेख, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे, यासीन मकानदार, बाबूलाल लिगेवाण, सिद्धाराम काळे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
पूर्णवेळ ग्रामसेवकाच्या नियुक्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून मंद्रूप ग्रामपंचायतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.


0 Comments