मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदणी येथे पोलिसांनी नाकाबंदी करून ६ लाख ९३ हजार १० रुपयांचा अवैध प्रतिबंधित गुटखा पकडला. गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा XUV-500 कार (किंमत अंदाजे १६ लाख रुपये) असा एकूण २२ लाख ९३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना XUV-500 मधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदणी येथे नाकाबंदी करण्यात आली. पहाटे सुमारे ६ वाजता संशयित पांढऱ्या रंगाची XUV-500 अडवून तपासणी केली असता पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी यांनी गुटख्याची पाहणी करून कारवाई केली.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक विजयकुमार कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहायक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस नाईक सिकंदर मुल्ला, पोलीस शिपाई श्रीशैल शिवणे, मनोज राठोड, माजिद शेख यांनी केली.


0 Comments