मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेता सीतामाई तलावात कॅनॉलद्वारे पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी ग्रामपंचायत मंद्रूपकडून करण्यात आली आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सीतामाई तलावाच्या खालील बाजूस मंद्रूपची पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील काही भागातील पाणीपुरवठा खंडित होत आहे. तसेच परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या बोअरवेल व विहिरी कोरड्या पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सीतामाई तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीला अप्पाराव कोरे, रमेश नवले, अंबण्णा काळे, मल्लू जोडमोठे, सुरेश म्हेत्रे, शिलू बोराळे, गिरीश कुलकर्णी, सुंदरकांत बोराळे, अप्पाशा नडवीनअंगळ, धरेप्पा नडवीनअंगळ, विलास नवले, श्रीकांत नवले, अमोगसिद्ध बोराळे, नागनाथ बोराळे, महासिद्ध बोराळे, उत्तम वाघमोडे आणि शिवानंद जोडमोठे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सीतामाई तलावात पाणी सोडण्याच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




0 Comments