Advertisement

Breaking News
Loading...

बहुजन शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न सात टक्के लाभांशाचे वितरण...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | येथील बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  श्री. दिगंबरराव ढेपे प्रशाला बाळे, सोलापूर येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषय सर्वानुमते संमत करण्यात आले असून सभासदांना सात टक्के लाभांश वितरित करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत भारतीय स्टेट बँकेचे इन्शुरन्स मॅनेजर आनंद गायकवाड यांनी भारतीय स्टेट बँकेच्या विमा संदर्भातील योजनांची सविस्तर माहिती सभासदांना दिली .या सभेत पतसंस्थेचे सभासद ज्यांची निवड, नियुक्ती ,पदोन्नती झालेली आहे तसेच मुख्याध्यापक प्राचार्य पदी नियुक्ती झालेले सभासद ,सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत सभासद पाल्य यांचा सन्मान पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, चेअरमन प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड ,व्हाईस चेअरमन प्रा. युवराज भोसले, रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष श्याम सुंदर गायकवाड, प्राचार्य प्रकाश शिंदे ,मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, प्रफुल्ल जानराव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिभांना पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली .

 या सभेत रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक प्रा. माणिक कोकरे यांनी केले.सूत्रसंचलन व्हाईस चेअरमन प्रा. युवराज भोसले यांनी केले. यावेळी पतसंस्थेच्या सभासदांना सात टक्के लाभांश जाहीर करीत असल्याची घोषणा चेअरमन प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केली .यावेळी सभासदांच्या हिताची जोपासना करण्यासाठीं कटिबद्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सांगितले .या सभेला पतसंस्थेचे संचालक मिलिंद भालशंकर, हरून तांबोळी ,बाळासाहेब डोळसे माजी संचालक मल्लिकार्जुन कांबळे, राष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विठ्ठल मोरे,  सावळेश्वर टोलचे मॅनेजर फारुक तांबोळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पतसंस्थेचे संचालक प्रफुल जानराव यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर लाभांश वितरित करण्यात आला .स्वादिष्ट भोजन सर्व सभासदांना दिल्यानंतर सभेची सांगता झाली.


Post a Comment

0 Comments