वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिंगडगांव, शिरवळ (जै.) व होटगी या गावांमधून मागील चार महिन्यांत चोरीस गेलेल्या एकूण 4 मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या हस्तगत करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी करमाळा, पुणे जिल्हा व कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे तपास करून 4 आरोपींना अटक केली आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकली संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आल्या आहेत.
सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपासिक अंमलदार पोहवा श्रीशैल माळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे जाऊन तपास करून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या 4 मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून तक्रारदारांना त्यांच्या मोटारसायकली परत मिळाल्या आहेत.
सदर कामगिरी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; तसेच मा. श्री. राजेंद्र टाकणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्री. राहुल डोंगरे, प्रभारी अधिकारी, वळसंग पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये तपास अधिकारी पोलीस हवालदार श्रीशैल माळी, पोलीस हवालदार विकास क्षिरसागर तसेच मदतनीस पोलीस नाइक संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल महेश कुंभार व पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


0 Comments