Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

देवीकवठा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला बसणार चपराक

अक्कलकोट तालुक्यातील देवीकवठा येथे सन 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रेखा धर्मेश शिवशरण या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या होत्या.काशीबाई संगप्पा कारले याही निवडून आल्या होत्या.दरम्यान सरपंच पद महिलासाठी राखीव असल्याने पॅनलप्रमुख आणि ग्रामस्थांच्या वतीने एकमताने अडीच-अडीच वर्षासाठी विभागून घ्यायचे ठरले होते.तसे सरपंच काशीबाई कारले आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रेखा धर्मेश शिवशरण यांच्यात सरपंच पद उपभोगण्याचे ठरले होते.तर उपसरपंच पदी साईनाथ देवाप्पा शिवशरण यांची निवड करण्यात आली होती.अडीच वर्षे कालावधी 25 ऑगस्ट 2023 रोजी संपून देखील विद्यमान सरपंच काशीबाई कारले यांनी दिलेला शब्द न पाळल्याने इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचे ठरवले आहे.तसेच विद्यमान संरपंच काशीबाई कारले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार  सुरु असल्याने येथील ग्रामस्थ देखील वैतागले असल्याचे आमच्या पत्रकारांना दिसून आले.देवीकवठा गावचे ग्रामसेवक अजनाळकर,गटविकास अधिकारी येथील मनमानी कारभाराकडे कधी लक्ष देतील,असा सवाल येथील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.


वास्तविक पाहता पत्रकारांनी या संदर्भात सरपंच प्रतिनिधी संगप्पा कारले तसेच उपसरपंच साईनाथ देवप्पा शिवशरण यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.मागील अडीच वर्षात देवीकवठा ग्रामपंचायती मध्ये विकासकामे झाली नसून केवळ विकासकामाच्या नावाखाली बिले उचलल्याचा आरोप विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.


एकंदरीत देवीकवठा गावातील विकासकामांची पाहणी आमच्या पत्रकारांनी केली असता तेथे अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आली आहेत.त्याचा सविस्तर खुलासा आम्ही पुराव्यासह पुढील भागात सादर करणार आहोत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments