सोलापूर प्रतिनिधी – हॅलो रिपोर्टर न्यूज:
सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार “2009 पूर्वी नियुक्त शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करावी, अन्यथा सेवा समाप्त” असा निर्णय दिला आहे. या अन्यायकारक आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मूक मोर्चात महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाने सक्रिय सहभाग जाहीर केला असून, संघटनेचे सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सभासदांना सकाळी 10 वाजता सोलापुरातील चार पुतळा येथे वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सांगितले की,
> “हा निर्णय शिक्षकांच्या सेवाभावावर घाला आहे. अन्यायकारक टीईटी सक्ती रद्द करण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत.”

0 Comments