Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर क्राईम ब्रँचच्या दक्षतेला सराफ असोसिएशनचा सलाम..!

सोलापूर प्रतिनिधी | हॅलो रिपोर्टर न्यूज

सोलापूर क्राईम ब्रँचचे प्रभारी अरविंद माने सर आणि त्यांच्या पथकाचा सोलापूर सराफ असोसिएशन तर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

हा सन्मान त्यांनी सोलापूर शहरातील आरटीओ ऑफिस रोडवरील “समर्थ ज्वेलर्स” येथे झालेल्या दरोड्याचा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणून आरोपींना अटक केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.

क्राईम ब्रँचच्या पथकाने दाखवलेली तत्परता, नियोजनबद्ध तपास कौशल्य आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची कार्यक्षमता याबद्दल सराफ असोसिएशनने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी सोलापूर क्राईम ब्रँचचे प्रभारी अरविंद माने सर यांच्यासह ए पी आय शैलेश खेडकर व अन्य पोलीस अंमलदार उपस्थित होते

या यशस्वी कारवाईमुळे सोलापूर शहरातील व्यापारी व सराफ वर्गामध्ये सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.


📸 फोटो कॅप्शन:
क्राईम ब्रँच प्रभारी अरविंद माने सर आणि पथकाचा सराफ असोसिएशनच्या वतीने सन्मान करताना...

 

Post a Comment

0 Comments