Advertisement

Breaking News
Loading...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी आणि ₹ 40,000 दंडाची कठोर शिक्षा...

 


दक्षिण सोलापूर, (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे): दि. ६ डिसेंबर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अंबादास गावडे, रा. गावडेवाडी याला सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि ₹ 40,000 दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.



प्रकरणाची हकीकत: —
फिर्यादी कुटुंबासह गावडेवाडीत वास्तव्यास होते. त्यांची मुलगी (पीडिता) दहावीची परीक्षा संपल्यामुळे घरीच होती. दि. ०३/०५/२०२० रोजी दुपारी २ वाजता पीडिता घरातून बाहेर गेल्यानंतर ती सापडत नसल्याने शोध घेतला असता ती आरोपी अंबादास गावडे यांच्या घरातून बाहेर येताना दिसली.

फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेऊन काय झाले असे विचारले असता सुरुवातीला ती घाबरल्यामुळे काही बोलली नाही. मात्र पुन्हा विचारल्यावर तिने सांगितले की दि. 08/05/2020 रोजी आरोपीने तिला आपल्या घरात बोलावून जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला आणि कोणाला सांगितले तर जीव मारण्याची व घरच्यांना इजा करण्याची धमकी दिली.

तसेच याआधीही 3-4 वेळा आरोपी घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता आणि फोटो दाखवण्याची धमकी देत होता. याबाबतची फिर्याद मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल झाली.

न्यायालयीन प्रक्रिया: —
सरकार पक्षातर्फे ०६ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यात फिर्यादी, पीडिता आणि तपास अधिकारी हे महत्त्वाचे साक्षीदार होते. पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी गावडे याला २० वर्षे सक्तमजुरी व ₹40,000 दंड ठोठावला.

वकील मंडळी: —

फिर्यादी तर्फे : ॲड. अभिजित इटकर

सरकार पक्ष : ॲड. प्रकाश जन्नू, ॲड. शीतल डोके

आरोपी तर्फे : ॲड. शेडबाळे (सांगली)

यांनी काम पहिले.


Post a Comment

0 Comments