Advertisement

Breaking News
Loading...

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हा सचिव रवी देवकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दिलीप गायकवाड, नागेश सातपुते, महानंदा शिंदे, निर्मला मौळे, महिबूब तांबोळी, सिद्धेश्वर भुरले, आगतराव बनसोडे, प्रा. अभिजीत भंडारे, भागवत देवकुळे यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करीत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment

0 Comments