Advertisement

Breaking News
Loading...

एमआयडीसीतील बेकायदेशीर ७ मंगल कार्यालयांना अधिकाऱ्यांचे अभय? बहुजन हक्क अभियानचे बेमुदत आंदोलन...

 


सोलापूर शहर (हॅलो रिपोर्टर न्यूज ): सोलापूर औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील जागांवर अनाधिकृत व बेकायदेशीररीत्या विनापरवाना बांधकाम करून सुरू असलेल्या सात मंगल कार्यालयांविरोधात तसेच या बेकायदेशीर कृत्यास थारा देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात बहुजन हक्क अभियान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बेमुदत निषेध धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांनी हॅलो रिपोर्टर न्यूजशी बोलताना दिली.

एमआयडीसी क्षेत्रातील

1. दुस्सा इव्हेंट्स (गार्डन),

2. प्रो. प्रा. सत्यविजय कन्व्हेक्शन्स मल्टी पर्पज हॉल,

3. प्रो. प्रा. पद्मावती कन्व्हेक्शन्स,

4. महालक्ष्मी बँक्वेट्स A/C हॉल,

5. बालाजी मंगल कार्यालय,

6. ऐटलॉट मंगल कार्यालय

आणि

7. चाटला मंगल कार्यालय



या सात मंगल कार्यालयांचे मालक व चालक यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करून मंगल कार्यालये सुरू केली आहेत. याबाबत बहुजन हक्क अभियानच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे सविस्तर, मुद्देनिहाय तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी वारंवार कानाडोळा करून या बेकायदेशीर व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यामुळे संबंधित प्रादेशिक अधिकारी श्री. शिवाजी राठोड व इतर संबंधित अधिकारी- कर्मचारी यांच्याविरोधात संघटनेच्या वतीने बेमुदत निषेध आंदोलन छेडण्यात आले आहे. संबंधित सातही बेकायदेशीर मंगल कार्यालये बंद करून, त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मंगल कार्यालयांचे मालक व चालक यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही मोहन थळंगे यांनी दिला.



या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष दयानंद एस. बनसोडे मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शहर उपाध्यक्ष अश्फाक शेख, अल्पसंख्याक जिल्हा सचिव अफजल शेख, युवक शहराध्यक्ष रितेश अष्टुळ, शहर महिला अध्यक्षा लैला जमादार, अक्कलकोट महिला अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तसलीम शेख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शफीक शेख, जिल्हा उपाध्यक्ष अजय प्रक्षाळे, दक्षिण तालुका संघटक प्रकाश वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम नंदरर्गी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments