Advertisement

Breaking News
Loading...

वडापूर येथील कै. बाबुराव अण्णा पाटील माध्यमिक शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी... रिपब्लिकन सेनेचे सिद्धार्थ कांबळे यांचे 5 जानेवारीपासून पूनम गेट येथे बेमुदत चक्री उपोषण...



वडापूर | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे वडापूर येथील सोलापूर जिल्हा महिला बाल कल्याण समिती संचलित कै. बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास माध्यमिक प्रशाला या संस्थेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेना सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने सिद्राम उर्फ सिद्धार्थ महादेव कांबळे यांनी दि. 5 जानेवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पूनम गेट येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे.


गेल्या 40 वर्षांपासून संबंधित संस्था योग्य पद्धतीने कार्यभार चालवत नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरलेला असून विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेतील गंभीर बाबी पुढे आल्या.

कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

शाळेत सध्या 3 शिक्षकांची कमतरता आहे.

अनुकंपा तत्त्वावर भरायची शिक्षकाची जागा अद्याप रिक्त आहे. अनुकंपा तत्वावर चंद्रमणी वाघमारे हे पात्र असताना त्यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. त्यामुळे चंद्रमणी वाघमारे व त्यांचे कुटुंबीय नाहक भरडले जात आहेत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सेवा लाभ आजतागायत देण्यात आलेले नाहीत.

गेल्या 30 वर्षांपासून वडापूर ग्रामपंचायतीच्या 3 खोल्या बेकायदेशीररित्या वापरात आहेत.

शाळेची स्वतःची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना गळक्या पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आहे.

चौकशी करूनही कारवाई नाही:
या सर्व बाबीं संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे चौकशी व प्रशासक नियुक्तीची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप कांबळे यांनी केला आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलीस संरक्षणाची मागणी:
उपोषण काळात स्वतःच्या जीवितास धोका असल्याची शक्यता व्यक्त करत, कांबळे यांनी उपोषणस्थळी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments