Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख अखेर जाहीर.. ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला अखेर वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.


न्यायालयाच्या आदेशानंतर ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच जोर चढला आहे.


🗳️ असा आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम:


▪️ अर्ज दाखल करण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी

▪️ अर्ज छाननी: २२ जानेवारी

▪️ उमेदवारी माघार: २७ जानेवारी

▪️ अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर


मतदान आणि निकालाची तारीख:

👉 मतदान: ५ फेब्रुवारी २०२६

⏱️ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

👉 मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६

⏱️ सकाळी १० वाजल्यापासून


आजपासून संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने नवीन घोषणांवर आणि विकासकामांवर निर्बंध आले आहेत. इच्छुक उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments