Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखेत बदल; मतदान 7 फेब्रुवारीला, मतमोजणी 9 फेब्रुवारीला...

 


मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज :

निवडणूक विशेष वार्तांकन |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

यापूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून, 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी मतमोजणी आता सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र छाननी व माघार, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या मतदान, मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

दरम्यान, मा. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी स्व. अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत शासकीय दुखवटा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

सुधारित निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

मतदान: शनिवार, 7 फेब्रुवारी 2026

वेळ : सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30

जाहीर प्रचाराची समाप्ती:

5 फेब्रुवारी 2026, रात्री 10 वाजता

मतमोजणी: सोमवार, 9 फेब्रुवारी 2026

वेळ : सकाळी 10 वाजता

आचारसंहिता: निकाल जाहीर होताच संपुष्टात

निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध:

11 फेब्रुवारी 2026 पर्यंत

संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करणार आहेत.



Post a Comment

0 Comments