Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण सोलापूर तालुक्यात बोगस जनावरांच्या डॉक्टरांचा सुळसुळाट; चुकीच्या उपचारामुळे जनावरांचा मृत्यू...




मंद्रूप :
तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :


दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट, टाकळी व मंद्रूप परिसरात बोगस जनावरांच्या डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. आजवर बोगस डॉक्टरांबाबत ऐकायला मिळत होते, मात्र आता जनावरांवर उपचार करणारे डॉक्टरही बोगस असल्याचे दिसून येत आहे.


या तथाकथित डॉक्टरांकडून कोणतेही अधिकृत शिक्षण, नोंदणी अथवा परवाना नसताना जनावरांवर उपचार केले जात असून, त्यांच्या चुकीच्या औषधोपचारांमुळे अनेक जनावरे दगावली आहेत. कुरघट टाकळी व मंद्रूप परिसरातील शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बोगस डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या इंजेक्शन व औषधांमुळे जनावरांचा तात्काळ किंवा काही दिवसांत मृत्यू होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या परिसरात कार्यरत असलेल्या जनावरांच्या डॉक्टरांची नोंदणी व पात्रतेची तपासणी करावी आणि दोषी बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.


टीप : येथे वापरण्यात आलेले फोटो प्रतिकात्मक आहेत. )

Post a Comment

0 Comments