बरूर|प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :
मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर आज डॉ. चनगोंडा हविनाळे (काका) यांच्या शेतात पारंपरिक हुरड्याचा आस्वाद घेत सण उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणाऱ्या या कार्यक्रमात आमदार मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख साहेब यांनी उपस्थित राहून शेतकरी आणि ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला.
या प्रसंगी संगप्पा (मामा) केरके, विक्रांत हविनाळे, मलाना पाटील, सुरेश बगले, श्रीशैला हत्तरसांग, सिद्धाराम जानकर आणि अनिल गुज्जा यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतात तयार झालेल्या हुरड्याचा मनसोक्त आस्वाद घेत सर्वांनी मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित केला.
शेतकऱ्यांच्या श्रमातून उभ्या राहणाऱ्या पिकांचे महत्त्व आणि ग्रामीण जीवनशैलीचे सौंदर्य यांचे दर्शन या निमित्ताने घडले. पारंपरिक खाद्यसंस्कृती जपत अशा उपक्रमांमधून सामाजिक सलोखा आणि आपुलकी अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :
प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर
मोबाईल 99233 93329
मल्लिकार्जुन कांबळे
मोबाईल 90758 45653




0 Comments