मंद्रूप | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
मंद्रूप ग्रामदैवत श्री. मळसिद्ध महाराज यांच्या वार्षिक यात्रेला सोमवार, दि. १२ जानेवारीपासून तेलाभिषेकाने भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. ही यात्रा १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी दिली.
सोमवारी मानेच्या चारही नंदींचे विधीवत पूजन करून तेलाभिषेक करण्यात आला. यावेळी श्री. वीरभद्र, सुतार समाजाची काळम्मा देवी तसेच मातंग समाजाची भुताळसिद्ध देवी अशा चारही मानेच्या नंदींचा समावेश होता. दुपारी सर्व नंदींची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी दिवसभर विविध भजन, जागर आणि हरिपाठाचे कार्यक्रम पार पडले. रात्री मानाच्या चारही नंदींची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीनंतर मंदिरासमोर होमविधी होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मळसिद्ध गायक संघ, मंद्रूप व हळसिद्धेश्वर गायक संघ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी कळगीतुराची गाणी होतील. दुपारी माजी सरपंच स्व. हर्षवर्धन देशमुख यांच्या स्मरणार्थ हव्यवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीचा भव्य फड रंगणार आहे. सायंकाळी शोधबे दारकाम, दहा वाजता ‘दुर्दैव’ हे सामाजिक नाटक तर रात्री बारा वाजता ‘डिजीटू’ हा सामाजिक देखावा सादर केला जाणार आहे.
शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मळसिद्ध महाराजांच्या शेखावटी आखाड्यात नामांकित मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगणार आहे. या कुस्ती फडाचे उद्घाटन औदुंबरसिद्ध महाराज यांच्या हस्ते होणार असून, दिवसभर बसवराज तांबोळे विरुद्ध विद्यार्थी मस्कनाळ यांच्यात कळगीतुराची गाणी होणार आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :
प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर
मोबाईल 9923393329
मल्लिकार्जुन कांबळे
मोबाईल 90758 45653


0 Comments