Advertisement

Breaking News
Loading...

“प्रचाराचा शुभारंभ की विजयाचा जल्लोष?” – बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनेश अचलारे यांच्या प्रचाराने उडवला भगवा जल्लोष...

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे,|

बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार धनेश सुभाष अचलारे यांच्या निवडणूक प्रचार कार्याचा शुभारंभ बोरामणी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात विधीवत नारळ फोडून करण्यात आला. या शुभारंभ सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जमलेली प्रचंड गर्दी पाहता हा प्रचाराचा प्रारंभ आहे की थेट विजयाचा जल्लोष, असा प्रश्न उपस्थितांना पडला होता.


या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नूतन नगरसेवक अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख अमर मालक पाटील, राजनभाऊ जाधव (राष्ट्रवादी – शरद पवार गट), मनीष भैय्या काळजे, राम अप्पा चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार यात्रेत शिवसैनिक, महिला भगिनी, युवती व युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण बोरामणी परिसर भगवामय करून टाकला.



प्रचार सभेला संबोधित करताना अमोल बापू शिंदे म्हणाले, “सर्वांच्या हाकेला धावून जाणारे, जमिनीवर राहून काम करणारे नेतृत्व म्हणजे धनेश अचलारे. त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन बोरामणी जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचा भगवा फडकवा.”

यावेळी अमर मालक पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करत, “भूलथापांना बळी न पडता सामान्य जनतेसाठी सातत्याने झटणाऱ्या कार्यकर्त्याला, म्हणजेच धनेश अचलारे यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन केले.

उमेदवार धनेश अचलारे यांनी आपल्या भाषणात, “ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आहे. आपण धनशक्तीला डावलून जनशक्तीच्या बाजूने उभे राहा,” असे सांगत जनतेशी थेट संवाद साधला. मराठा आरक्षण मोर्चाला सातत्याने पाठिंबा देणारे, तसेच सर्वधर्म समभाव मानणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते राजनभाऊ जाधव यांनी जाहीर पाठिंबा देत भाजपवर टीकेची झोड उठवली. “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपच्या पिलावळांना यावेळी जनता त्यांची जागा दाखवेल. धनेश अचलारे यांना आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून देणार,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला!” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण बोरामणी परिसर दुमदुमून गेला.

एकूणच, या प्रचाराच्या शुभारंभाने बोरामणी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून, धनेश अचलारे यांच्या प्रचाराला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद आगामी विजयाची नांदी मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments