मंद्रूप|हॅलो रिपोर्टर न्यूज|प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :
काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख यांनी मंद्रुप पंचायत समिती गणातील उमेदवार अनंत म्हेत्रे यांच्यासोबत होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
मंद्रुप जिल्हा परिषद गटातून यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख हे मंद्रुप, वांगी, वडकबाळ, बसवनगर आदी गावांमध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. मंद्रुप पंचायत समिती गणातील उमेदवार अनंत म्हेत्रे व त्यांच्या संपूर्ण टीमसोबत काँग्रेसलाच मतदान का करावे, याची भूमिका ते प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत.
“मंद्रुप गण व मंद्रुप गटातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ठाम ग्वाही शेख यांनी मतदारांना दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज दरवाढीविरोधात आंदोलन, ऊस दरवाढीसाठी केलेले लढे यामधून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे.
उच्चशिक्षित व सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या महमद शेख यांच्या पत्नी सनाकौसर शेख यांना उमेदवारी मिळाल्यानंतर, पक्षाने खऱ्या अर्थाने तळमळीच्या कार्यकर्त्याला संधी दिल्याचे समाधान नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांचा विश्वास व प्रेम मिळवणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून शेख यांची ओळख निर्माण झाली आहे.
शेतकरी, युवक, महिला व सामान्य नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रोत्साहन हीच आपली खरी ऊर्जा असल्याचे महमद शेख सांगतात. प्रस्थापित राजकारणाविरोधात सामान्य जनतेच्या आशिर्वादाने जिल्हा परिषद निवडणुकीत नवे आव्हान उभे राहत असल्याचे चित्र मंद्रुप गटात दिसून येत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क:
प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
हॅलो रिपोर्टर न्यूज
मोबाईल : 9923393329



0 Comments