Advertisement

Breaking News
Loading...

होटगी रोडवर गॅस लिकेजमुळे रिक्षा पेटली; फायर ब्रिगेडच्या तत्काळ कारवाईने मोठा अनर्थ टळला...

 


सोलापूर शहर : हॅलो रिपोर्टर न्यूज :

होटगी रोडवरील ईएसआय हॉस्पिटल समोर मंगळवारी सायंकाळी सुमारे पावणे पाच वाजेच्या सुमारास गॅस लिकेजमुळे एका रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रिक्षामधील गॅस सिलिंडरमधून लिकेज झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाडीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वेळेत आग विझवण्यात आल्याने गॅसचा स्फोट होऊन मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.


आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या घटनेनंतर रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. फायर ब्रिगेड व पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.


या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments