भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
निर्वाचक गण क्रमांक ६२ भंडारकवठे (अनुसूचित जमाती महिला) या गणात कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार नेहा शशिकांत कुपसंगे व सौ. सवीता महेंद्र उंबरजे यांनी विकासाभिमुख दृष्टीकोनासह प्रचाराला वेग दिला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या सहकार्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचारकार्यक्रम जोमात सुरू असून गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मु. सादेपुर, पो. निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या नेहा कुपसंगे तसेच सौ. सवीता महेंद्र उंबरजे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत भंडारकवठे गणाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, महिला व युवक सक्षमीकरण, स्वच्छता व सुरक्षा या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला.
प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी “जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रत्येक गावाचा समतोल व पारदर्शक विकास साधू” असा ठाम निर्धार व्यक्त केला. नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता भंडारकवठे गणात निवडणूक वातावरण तापत असून, विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचाराला मतदारांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
एकूणच, भंडारकवठे अनुसूचित जमाती महिला गणात नेहा शशिकांत कुपसंगे व सौ. सवीता महेंद्र उंबरजे यांच्या प्रचाराला चांगली चालना मिळत असून, विजयाचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

0 Comments