मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पंचायत समिती गणात भाजपने निर्णायक आघाडी घेतली असून, मंद्रूप रिक्षा संघटनेने भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मळसिद्ध शिवानंद मुगळे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत.
स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेने मुगळे यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्क, पारदर्शक कामकाज आणि विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास दाखवत भाजपच्या प्रचारात थेट उतरायचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या या ठाम भूमिकेमुळे मंद्रूप ग्रामीण भागात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे.
मळसिद्ध मुगळे आपल्या प्रचारात खड्डेमुक्त रस्ते, शाश्वत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत असून, “फक्त आश्वासन नाही तर काम करणारा उमेदवार” अशी त्यांची ओळख मतदारांमध्ये ठसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदारांनी मंद्रूप गणावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, मळसिद्ध मुगळे यांच्या विजयासाठी संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची फळी सज्ज झाली आहे.
या प्रसंगी मंद्रूप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष निसार बागवान, राहुल शिंदे, शिवा परांडे, बबन अण्णा, अंकुश शिंदे, अमन शेख, महबूब शेख, सिराज काझी, प्रवीण परांडे, शंकर मरीआईवाले, दयानंद नंदुरे यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments