Advertisement

Breaking News
Loading...

न्यायाधीश पथकाचा अक्कलकोटमध्ये अचानक धडक दौरा; सीमावर्ती शाळांच्या गुणवत्तेवर थेट लक्ष...


अक्कलकोट | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर आवटी यांच्या पथकाने अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर, अक्कलकोट स्टेशन, तोळणूर, कडबगाव केंद्रातील मराठी, कन्नड व उर्दू अशा एकूण ५ शाळांना अचानक भेट देत शैक्षणिक कामकाजाची सखोल पाहणी केली.


या दौऱ्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता तसेच पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वर्गखोल्यांची स्थिती तपासण्यात आली. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर भर द्यावा तसेच मुलींच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. आवटी यांनी दिल्या.

पथकाने वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांचे वाचन तपासले आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन व शिस्तबद्ध शालेय व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळांमधील भौतिक अडचणी मांडल्या असून त्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पथकाने दिले.


या वेळी पथकासोबत पोलीस विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक अफरीन शेख, महसूल विभागाकडून नायब तहसीलदार संजय भंडारे, तसेच शिक्षण विभागाचे प्रतिनिधी शिक्षण विस्ताराधिकारी बापूराव जमादार उपस्थित होते.

दरम्यान, नागणसूर जिल्हा परिषद शाळेसमोर न्यायाधीश व पोलीस गाड्या आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मोठी गर्दी झाल्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात आला. ग्राम शिक्षण समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून शाळांच्या अडचणी समजून घेतल्या.

गुरुवारी झालेल्या या अचानक भेटीमुळे शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी दूर होऊन गुणवत्तावाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments