मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | वृत्तांकन मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर:
शंकरनगर (विंचूर) येथील शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षे ७ महिने वयाच्या आश्विनी आनंद राठोड हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत तिचे वडील आनंद गंगाराम राठोड (वय ४८, व्यवसाय – मजुरी, रा. शंकरनगर, विंचूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात खबरी जबाब दिला आहे. दिलेल्या माहितीनुसार, आश्विनी ही सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास ती व तिची धाकटी बहीण शुभांगी शाळेतून घरी परतल्या. त्यानंतर आश्विनी हिने शुभांगीला मैत्रिणीकडे वस्तू देण्यासाठी पाठवले.
सुमारे वीस मिनिटांनी शुभांगी घरी परत आल्यानंतर आश्विनी ही घराच्या मागील खोलीत पत्र्याच्या शेडखाली असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बाब तात्काळ कुटुंबीयांना कळविण्यात आली.
त्यानंतर कुटुंबीयांनी तिला खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेबाबत कोणावरही संशय अथवा तक्रार नसल्याचे वडील आनंद राठोड यांनी जबाबात नमूद केले आहे.
मंद्रूप पोलीस ठाण्यात सदर घटनेची अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 Comments