Advertisement

Breaking News
Loading...

एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे घटनास्थळी; आहेरवाडीत शॉर्ट सर्किटने घर जळून कष्टाचा संसार राख...

 


आहेरवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत इरेश भागण्णा बोरूटे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत सोने-चांदी, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणात राख झाल्याने बोरूटे कुटुंब मोठ्या संकटात सापडले असून सध्या हे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने घरातील सर्व सदस्य वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच कुंभारी येथील अतिथी प्युअर व्हेज तसेच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक महादेव कोगनुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोरूटे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत मदतीचा हात पुढे केला.

बोरूटे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या या संकटाच्या प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबाला सढळ हाताने आर्थिक व वस्तूरूप मदत करावी, अशी भावनिक विनंती जनसेवक महादेव कोगनुरे यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments