Advertisement

Breaking News
Loading...

पंढरपूर आषाढी वारीत फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर; विधानपरिषदेत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे एसपी अतुल कुलकर्णी यांना कौतुक...

 


सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : पंढरपूर येथील आषाढी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत फेस रिकग्निशन प्रणाली राबवली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेतली गेली असून विधानपरिषदेत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पंढरपूर वारीदरम्यान अत्याधुनिक फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या माध्यमातून सुमारे २० लाख वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन करण्यात आले. त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा, हरवलेल्या व्यक्तींचा शोध तसेच संशयित व्यक्तींची ओळख पटविणे यामध्ये पोलिसांना मोठी मदत झाली.

सन २०२५ मध्ये आषाढी वारीसाठी सुमारे २७ ते २८ लाख भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी आले होते. त्या काळात २८६१ जण हरवले होते, त्यापैकी २८५२ जणांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात पोलिसांना यश आले.

हा उपक्रम राज्यातील मोठ्या धार्मिक ठिकाणी राबविण्यात आलेला एक नाविन्यपूर्ण प्रयोग ठरला असून भविष्यातही पोलिसिंग अधिक सक्षम करण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवण्याचा प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलीस दल करणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

या उपक्रमात अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच तांत्रिक पथकाने परिश्रमपूर्वक काम करून हा प्रकल्प यशस्वी केला.



Post a Comment

0 Comments